पर्यावरणाचे रक्षण म्हणजे स्वताचे रक्षण

 

 
 

  पर्यावरण वाचवा

 

आज पृथ्वीवरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे याच मुख्य कारण आपण पर्यावरणाकडे केलेले दुर्लक्ष. शहरतील प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद उपसा, शहरातील वाहनांचे वाढते प्रमाण हे पर्यावरण शुद्ध राखण्यास घातक ठरत आहे. जल,वायु,ध्वनी यांचे प्रदुषण तर पर्यावरणाला मारकच आहे. म्हणून आता शहरीकरण करताना निसर्ग साखळी कोठे तुटली जात नाही ना याचा विचार होणे गरजेचे आहे.कारण कितीही सुधारणा झाल्या तरी पर्यावरणाचा समतोल टिकला नाही तर त्यांचा काहीच उपयोग होणार नाही.

          निसर्ग आणि मानव यांचे सहजीवन अगदी प्राचीन काळापासून  आहे. आपल्या ऋषीमुनिंनी ते  ऑळखल त्याचा अभ्यास केला. आणि विविध मार्गानी टिकविण्याचा प्रयत्नही त्यांनी वर्षानुवर्षे केला.

 पण औध्योगिक क्रांतीनंतर मात्र माणूस निसर्गापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागला. निसर्गापासून दूर जाऊन निसर्गावर मात करण्याचे अनेक क्षेत्रातील मानवाचे प्रयत्न मानवाला पर्यावरणापासून दूर नेत आहेत. आपण निसर्गापासून वेगळे आहोत; ही मानवाची भावनाच मुळी चुकीची आहे. माणसाने निसर्गावर हल्ले चढवले; तर निसर्ग कसा स्वस्थ बसेल ? भूकंप ,महापूर दुष्काळ ज्वालामुखी उद्रेक, त्सुनामी, अतिवृष्टी किंवा कमी वृष्टी अशा अनेक हत्यारांनी निसर्गही आपल्यावर हल्ले चढवतच आहे. ती नैसर्गिक आक्रमणे परतवून लावयची असतील तर निसर्गाशी हातमिळवणी करून त्याचा ढळलेला समतोल जैसेथे करण्यात मानवानेच पुढकार घेणे गरजेचे आहे. पुढच्या पिढीसाठी तरी आपण पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 

 

 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Popular Posts

LEAVE A REPLY

Name

Email *

Message *